महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी सरकार सत्तेत आल्यावर थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा कर्ज माफ करून सातबारा कोरा करू असे सत्तेत असलेले आमदार, मंत्र्यांनी यांनी आश्वासन दिले होते. सत्तेत येऊन बराच काळ लोटून गेला परंतु अजून पर्यंत एकाही शेतकऱ्याचा कर्जमाफ झालेला नाही व सातबारा कोरा केलेला नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मोर्चे, धरणे, आंदोलन, सुरू आहेत. शेतकरी मार्च महिन्यात इकडून तिकडून पैसे मागून सरकारचा नियमित कर्ज भरतो. कधीही कर्ज बाकी ठेवत नाही.