सैलानी बाबाचे दर्शन घेऊन सैलानी वरून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या क्रुझर जीप क्रमांक एमएच २६ एके ६५९२ या जीप समोर अचानक वन्यप्राणी रानडुक्कर आले यानतर चालकाचे जीप वरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्याच्या कठड्याला धडकल्याची घटना दिनांक 23 ऑगस्ट शनिवार रोजी रात्री सव्वा अकरा वाजे दरम्यान औंढा नागनाथ ते वसमत मार्गावर औंढा तालुक्यातील काठोडा चोंडी जवळ घडली.या भीषण अपघातात नांदेड जिल्ह्यातील सात जण गंभीर जखमी झाले जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले