निवडणुकीपूर्वी भाजपने एनएचएम कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याचा जीआर काढला, मात्र दीड वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. २५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाश तायडे यांनी भेट देत पाठींबा दिला. निवडणुकीत मतांसाठी गोड बोलून प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांची थट्टा होत असल्याचे तायडे म्हणाले. दशकभर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून शासनाने निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी न केल्