घनश्याम बालचंद सोनी वय ५१ वर्ष राहणार अकोला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १६ जून रोजी एसबीआय मुख्य शाखा अकोला येथे एका अनोळखी महिलेची भेट झाली तिने मोबाईल नंबर घेऊन सतत संपर्क साधला व २ जुलै रोजी ग्राम खरब ढोरे येथे बोलावले फिर्यादी हे त्या महिलेच्या घरी गेले असता आरोपी पती पत्नीने फिर्यादीला बदनामी व बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणार अशा धमकी देत रोख व ऑनलाईन पद्धतीने एकूण १८ लाख ७४ हजार रुपये उकडले आरोपींनी ३० ऑगस्ट रोजी आणखी ५ लाखाची मागणी केली तर ग्रामीण पोलिसांनी आरोपींना पकडले.