लातूर:-- राज्य व देशभरात सहकारातील यशस्वी बँक म्हणून ओळखली जात असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वर्ष २०२५-२०२६ मधील खरीप हंगामासाठी १ हजार ४ कोटी २८ लाखाचे पिक कर्ज वाटप केले आहे. शासनाकडून लातूर जिल्हा बँकेस ९३३ कोटी ९८ लाख एवढे पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. इतर बँकांच्या तुलनेत लातूर जिल्हा बँक पिक कर्ज वाटपात सर्वात पुढे पहिल्या स्थानावर असून शेतकऱ्यांच्या हक्काची बँक ही ओळख लातूर जिल्हा बँकेने कायम ठेवली आहे.