तुमसर तालुक्यातील बिनाखी येथे गोठ्यात बांधलेल्या पाच शेळ्या चोरीला गेल्याची घटना दि.9 सप्टेंबर रोज मंगळवारला सकाळी 6 वा.च्या सुमारास उघडकीस आली. यातील फिर्यादी बळीराम रामचंद्र कोहळे रा.बिनाखी असे पशुपालकाचे नाव असून त्यांनी आपल्या मालकीच्या शेळ्या गोठ्यात बांधून ठेवले असता अज्ञात आरोपींनी गोठ्यात बांधलेल्या पाच शेळ्या लंपास केले. यावेळी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.