गुन्हे शाखा युनिट ६ कडील पथकाने तपास सुरु करून घटनास्थळ व आजूबाजूचे परीसरातील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करून अनोळखी आरोपीचे फोटो प्राप्त केले.नमुद गुन्ह्यातील आरोपी हा निगडी, पुणे येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने युनिट ६ कडील पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून विधीसंघर्षित बालक यास त्याचे पालक यांचे समक्ष ताब्यात घेवून नमुद गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत केली.