इचलकरंजीजवळील कबनूर गावात भानामतीच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीचा प्रकार आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता उघडकीस आला आहे. हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथील शेतकरी आशिष बाळासाहेब कांबळे यांच्या तक्रारीवरून कबनूर येथील रियाज सय्यद (रा.आंबेडकर नगर, गल्ली क्र.5) याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.