यावल शहरातील सुदर्शन चौकातून मोठ्या उत्साहात शुक्रवारी ईद मिलादुन्नबीची मिरवणूक निघाली होती. संपूर्ण शहरातून मार्गस्थ होत या मिरवणुकीचा समारोप चोपडा रस्त्यावरील ख्वाजा मज्जित जवळ झाला. संपूर्ण शहरातून नाते पाक पठण करीत निघालेल्या या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधले होते.ठीक ठिकाणी या मिरवणुकीत सहभागी मुस्लिम समाजबांधवांना मिठाईचे देखील वाटप करण्यात आले होते.