किनवट तालुक्यातील बेलोरी येथील पुलावरून ऑटोसह एक युवक वाहून गेला असल्याची घटना आजरोजी दुपारी 1:30 ते 2 च्या दरम्यान घडली असून ह्या ऑटोत असणाऱ्या इतर दोघांनी उडी मारून आपले प्राण वाचवले होते मात्र लक्ष्मण बळी रानमले हा युवक वाहून गेला होता, घटनेची माहिती मिळताच तहसीलदार चोंडेकर मॅडम पोनि चोपडे मुख्याधिकारी कुरवाडे हे हजर होत शोध कार्य सुरु केले होते मात्र संध्याकाळी 5 पर्यंत वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागला नव्हता