नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून दर्शनासाठी मुंबईकर अक्षरक्ष: उड्या घेतात. या गणपतीला असलेले जानवे हे अकोल्याचे आहे, असे म्हटले तर क्षणभर विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. गेल्या बारा वर्षांपासून मुंबईच्या लाल बागच्या राजाला अकोल्यातून बनवण्यात आलेले जानवे त्याच्या रूपात भर घालत आहे. लालबागच्या राजाला जानवे बनवण्याचा मान अकोल्याचे श्याम चेंडगे यांना मिळाला आहे. जानवेकार शाम चेंडगे यांनी मुंबईचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजासाठी जानवे बनवण्याआधी मंडळाच्या वेबसाईटला भेट