हातकणंगले तालुक्यातील तारदाळ मधील समर्थ नगर परिसरात शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटेने बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेची नोंद आज रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की तारदाळ येथील समर्थ नगर परिसरात विवेकानंद संभाजी आवळे हे वर्षांपसून वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री अनंत चतुर्थी निमित्त गणपती दर्शन घेण्यासाठी विवेकानंद आवळे आपल्या कुटुंबीयांसोबत गेले होते.