कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगर कमानी जवळ रात्री दोन गटात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांनी 30 ते 35 जणांची नावे निष्पन्न करत 100 ते 200 अनोळखी व्यक्तींवरती गुन्हा दाखल केला आहे.सध्या या परिसरात शांतता असून लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असा आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना केले.