पडोली येथील आमटा वॉर्ड परिसरात जवळपास 250 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. या घटनेत नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने मदतकार्य सुरू असून नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत हलविण्यात आले आहे. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी आज दि 2 सप्टेंबर ला 10 वाजता अधिकाऱ्यांसह सदर परिसराची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.