बाळापूर शहरातील श्री.चिंचपेंड संस्थान येथील १३ शिवभक्त कावडधारी मंडळ यावर्षी पालखी रथसह तेलंगणा राज्यातील श्री.क्षेत्र मल्लीकार्जुन येथे पोहचले व त्यांनी तेथून दि.१८ जुलै रोजी त्यांनी पदयात्रेला प्रारंभ केला.१४ व्या दिवशी म्हणजे गुरुवार दि.३१ जुलै रोजी सकाळी तेलंगणा राज्यातील बॉर्डर वरून महाराष्ट्रात त्यांचे आगमन झाले.तर श्री.चिंचपेंड संस्थान येथील कावडधारी १६ व्या दिवशी म्हणजे शेवटच्या सोमवारी दि.१८ ऑगस्ट रोजी ३० दिवसात तब्बल ८५० कि.मी.चा पायी प्रवास करत बाळापूर शहरात पोहचणार आहेत.