रावेर तालुक्यात पुनखेडा हे गाव आहे. या गावाच्या शिवारात भोकर नदी आहे या नदीच्या पुलावर भूषण कोळी, धनराज धनगर, धनपाल उर्फ गोलू रायमळे, भाऊराव रायमळे, विशाल कोळी, रितेश कोळी, अविनाश सोनवणे, पवन पाथरवड, खुशाल धनगर, निखिल कोळी व जितेंद्र सपकाळे हे आपसात वाद घालत होते. त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होत होती तेव्हा या ११ जणाविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.