रावेर तालुक्यात रसलपुर हे गाव आहे. या गावातून आभोडा जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर साईनाथ पवार यांची शेत आहे. या शेताजवळ दुचाकी क्रमांक एम. पी.१० आर.४७६६ हिला अज्ञात ट्रॅक्टर चालकाने धडक दिली. या अपघातात रामदास बारेला व करण बारेला दोघे ठार झाले. तेव्हा या अपघात प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.