अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव हुसेनपूर शेत शिवारातील शेती माल काढतांना आज सकाळी ११:३० वाजता दोन ट्रॅक्टर अडकल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून शेतकरी त्रस्त झाले आहेत.सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक शेत शिवारातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यावर साधे खडीकरण करण्यात आले नाही. आज सकाळी शेतकऱ्याच्या शेतातील केळी पिकाचा माल घेवून जात असताना दोन ट्रॅक्टर रस्त्याच्या गाठ्यात अडकले.