आज दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास यवतमाळ येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेच्या दिग्रस शहर प्रमुख पदी संजय कुकडी यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी मंत्री संजय राठोड यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करून निवड जाहीर केली. या निवडीनंतर दिग्रस शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी संजय कुकडी यांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.