शहरात गुंडगिरी व गुन्ह्याच्या विरोधात कडक पाऊले उचलत शहर पोलिसाने एका वर्षात एमपीडीए कायद्याअंतर्गत सलग दुसरी कार्यवाही केली आहे. शहरालगत चिखलगाव येथील कुख्यात गुंड अमोल विजय ठाकरे (31) रा. रामनगर चिखलगाव याच्यावर एमपीडीए कायद्याने कारवाई करून गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे