गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाला शनिवारपासून विश्रांती मिळाल्याने राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे.परिणामी, धरणाचे स्वयंचलित दरवाजे एकामागोमाग एक बंद होण्यास सुरुवात झाली होती.आज रविवार, दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटांनी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 देखील बंद झाला आहे. त्यामुळे सध्या धरणाची सर्व दरवाजे पूर्णतः बंद असून, विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आला आहे.सध्या केवळ बीओटी पॉवर हाऊसमार्फत 1500 क्युसेस पाणी भोगावती नदीत सोडले जात आहे.