गेल्या काही दिवसांपासून कृष्णा–पंचगंगा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे कुरुंदवाड व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र,शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळपासून नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.शिवतीर्थ परिसरात शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पंचगंगेचे पाणी रस्त्यावर आले होते, मात्र आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल 3 फूट 4 इंच पाणी कमी झाल्याने रस्ते मोकळे झाले आहेत.