छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दि.१७ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा राबविल्या जाणार आहे. त्याअंतर्गत तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्यांचे सीमांकन, अभिलेख अद्यावतीकरण करून प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे.त्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी,कर्मचारी यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी केले त्यांच्या समवेत तहसीलदार शिल्पा बोबडे उपस्थित होत्या.