जिल्ह्यातील कोरपना तहसील अंतर्गत येणा_या सांगोडा ग्रामपंचायतीत पांदन रस्ता, नालीवरील रपटा, अंगणवाडीला कपाट, टेबल, खुर्ची, खेळणी देने, जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सात अपंगांना पैसे वाटप, वैयक्तिक शौचालयाचा लाभ अशा कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी करून यात सहभागी व्यक्तिंवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी आज दि 7 सप्टेंबर ला 4 वाजता आयोजित श्रमिक पत्रकार भवन येथे केली.