शहरातील पुरातन नंदीपेठ येथील नंदिकेश्वर येथील नंदी महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती पोळा सण श्रावण मास सांगता असल्याने नंदीपेठ येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तर शहरातील नंदीपेठ, सोमवारवेस,सोनू चौक, रामटेकपुरा,खानापूर वेस ,पान अटाई येथे बैलपोळा भरला होता तर संध्याकाळी विविध ठिकाणचा पोळा फुटल्यावर घरोघरी महिलांनी बैलांची पूजा करून पूरणपोळी ठोंबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला .