औसा तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारांत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित कंपनी व दलालांवर महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी केली आहे. अशी माहिती शिवकुमार नागराळे यांनी दिली.