मराठा समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आरक्षण मिळू देत नाहीत अशी भावना निर्माण झाली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले आहे.ते कोणत्याही जातीचे, पातीचे आणि भाषेचे राजकारण करत नाही. ते महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार असल्याचे बॅनर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावले जात आहेत,यावर एकनाथ शिंदे यांनीं प्रतिक्रिया दिली आहे.