ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुने शहर पोलीस ठाणे हद्दीतील पातूर रोडवर धडाकेबाज कारवाई करून अवैधरित्या ऑटोमध्ये घरगुती गॅस सिलेंडर भरणाऱ्या दोन आरोपींना रंगेहाथ पकडले. घटनास्थळी 21 भरलेले व 17 रिकामे असे तब्बल 38 सिलेंडर, गॅस भरण्याच्या दोन मशिन, इलेक्ट्रॉनिक वजन काटे असा 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी राजू खान वय (32) व रिझवान पटेल वय (26) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरापर्यंत पार पडली असून, त्या