पंचवटी भागातील अश्वमेध नगर येथे नेहमीच्या भांडणाला कंटाळून मुलाने आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून पंचवटी पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीनुसार मुलावर व त्याचा एक अनोळखी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालिका नगर, दिंडोरी रोड येथील खरेदी महिला व तिचा पहिल्या नवऱ्याचा मुलगा यांच्यात नेहमी काही ना काही कारणावरून वाद होत असे.