जिंतूर शहरातील शासकीय तंत्र महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांचे पीएफ संबंधित कंपनीकडून मागील वर्षभरापासून भरण्यात आले नाही. तसेच त्यांचा पगारही वेळेवर करण्यात येत नाही. सुरक्षा रक्षकांचे वेतन अदा करण्यात भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित एजन्सी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील सुरक्षारक्षकांच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत आज सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी तीन ३ जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.