मिळालेल्या माहितीनुसार रमेश काशीराम घोलप वय ५० वर्ष रा.कासार वेटाळ पातूर हे होमगार्ड असून ते त्यांच्या मोटार सायकलने पातूर येथून बाळापूर येथील समूपदेशक होमगार्ड कार्यालय येथे अर्ज देण्याकरिता येत असतांना वाडेगाव येथील श्री.नारायण स्वामी संस्थान जवळ त्यांची तब्येत खराब झाल्याने तेथील लोकांनी वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.या प्रकरणी मुलाच्या फिर्यादी वरून बाळापूर पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद केली.