बाबळे फाट्याजवळ ट्रॅक्टरचा भीषण अपघात. सतीलाल झुलाल बिल वय 30 वर्ष राहणार पाडसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी बाबळे फाट्याकडून कलमाडीकडे गावाकडे जात असताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच 18 बीसी 36 44 उभे करून मी त्याच्यावर बसलेलो होतो. परंतु मागून येणारा कंटेनर क्रमांक एम एच झिरो चार केयू 75 03 वरील चालकांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत माझ्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली यात मला आता पायासह छातीला मारण करीत मला गंभीर दुखापत झाली. यावरून शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल.