करवीर पोलिसांनी कोपार्डे परिसरात रात्रीच्या वेळी तांब्याचे बंब चोरी करणाऱ्या एकाला अटक केलीय. स्वप्निल सोनाळे असं त्याचं नाव असून त्याच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीचे चोरीचे तांब्याचे बंब जप्त केलेत. दरम्यान आज सदर संशयित आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.