लातूर-लातूर शहरातील मुख्य रस्ते आणि फुटपाथवर मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिक्रमणामुळे रहदारी अत्यंत बिकट झाली आहे. या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.महानगरपालिकेने सर्व संबंधित नागरिकांना कडक इशारा जारी करत सांगितले आहे की, मुख्य रस्त्यावरील आणि फुटपाथवरील सर्व अतिक्रमण तातडीने २४ तासांच्या आत स्वतःहून काढण्यात यावे. नाहीतर, दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून बुलडोजर चढणार आहे.