आजारपणाला वैतागून सुनेनेच वृद्ध सासूचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना देवळाली कॅम्प भागातील आडके नगर येथे घडली आहे.आडके नगर येथे राहत असलेली सून शबाना शेख हिने जेठ रौफ याला सासू सकीना शेख यांचे पान न आणून दिल्याच्या कारणावरून सासू व सुनेमध्ये वाद-विवाद झाले,तसेच सासू सकीना शेख यांच्या आजाराला वैतागून सुन शबाना अब्दुल अजिज शेख हिने गळा दाबला. प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी नवीन बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.