बोथाकाजी येथील तरुणाचा मासेमारी करताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कंचनपुर येथील तोरणा नदी काठावर ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.या मृत्यू प्रकरणी दोघाविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत गोपाल चंद्रभान घटे वय २४ वर्ष रा. बोथाकाजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ गुलाब चंद्रभान घटे (वय २७) हा कंचनपूर येथील तोरणा नदीच्या काठावर गेला होता. त्याच्यासोबत गावातील शेख रशीद शेख शफीक व शेख समीर शेख कालु हे दोघेही गेले होते.