साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होण्यापूर्वीच वरुणराजा थांबला होता. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गणरायाची आरती केली तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या समवेत ढोल वाजून मिरवणुकीत सहभाग घेतला. दुपारी बाराला मिरवणूकीस सुरुवात झाली. मंत्री देसाई आणि जिल्हाधिकारी पाटील यांनाही ढोल वाजविण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी ढोल वाजून मिरवणुकीला सुरुवात करून दिली. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची ठिकठिकाणी गर्दी केली होती.