श्रावण मासानिमित्त दुसरा श्रावण सोमवार दि.४ ऑगस्ट रोजी जुनी चावडी येथील रत्नेश्वर महिला कावड मंडळच्या वतीने श्री.क्षेत्र नागझरी ते बाळापूर पायी पदयात्रा काढून जुनी चावडी तेलीपूरा येथील रत्नेश्वर मंदिरातील महादेवाला जला अभिषेक केला.दरम्यान हर बोला महादेवच्या गजराने शहर शिवमय करून टाकले होते. शहरात अशा प्रकारे महिलां मंडळींनी श्रावणमासानिमित्त मागील वर्षी पासून पायी कावड यात्रा काढत असल्यामुळे सर्वत्र महिलांचे कुतूहल व्यक्त केल्या जातं आहे.या महिलांचे शिव भक्तांनी जल्लोषात स्वागत केले.