जिंतूर शहरात हनुमान जयंती निमित्त मंगळवारी सायंकाळी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. जागृत हनुमान मित्र मंडळ व श्री हनुमान जन्मोत्सव समितीच्या वतीने सायंकाळी ६ वाजता सदर शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील जागृत हनुमान मंदिर, नरसिंह चौक भगवान बाबा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजार चौक, शनी मंदिर, गणपती मंदिर या मार्गावरून शोभायात्रा काढत श्रीराम मंदिर येथे श्री हनुमान महा आरती करून या शोभा यात्रेची सांगता करण्यात आली.