लातूर -रेणापूर तालुक्यातील पानगेश्वर साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिले व शेअर्सचे पैसे थकीत ठेवून, शेतकऱ्यांना एकाही प्रकारची आर्थिक देयके न देता कारखान्याची विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवत लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा शेतकरी गजानन बोळगे यांनी आज दि. 26 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.