महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हा कायदा जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारा असून त्यामुळे संवैधानिक हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत, कायद्या विरोधात संघर्ष समिती आणि इंडिया आघाडीच्या वतीने आज बुधवार 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 3 वाजेच्या सुमारास उपोषण मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात इंडिया आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारत जोडो अभियान, आदी पक्ष व संघटनाचे हजारो पदाधिकारी सहभागी झाले.