अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बाबू खान उस्मान खान (वय ५५ रा. मोहम्मदीया कॉलनी, बीड) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास बीड शहरातील तेलगाव रोडवरील सय्यद अली नगर पाटी जवळ घडली. आज सकाळी वॉकिंगला जात असलेल्या नागरीकांनी पाहिल्यानंतर याबाबतची माहिती त्यांच्या घरच्यांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीसांनी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.