सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कागल ते सातारा सहा पदरीकरण रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसुली थांबवावी,तसेच रस्त्यावरील खड्डे तातडीने भरावे,या मागण्यांसाठी आज गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने किणी टोल नाक्यावर तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केले.आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत टोल नाक्यावर वाहनांना टोल न देता जाण्यास प्रवृत्त केले.