नांदेड शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आहे. यामुळे नांदेड शहरासह तालुक्यातील अनेक गावात पुरपरिस्थिती निर्माण होवून नागरिक पाण्यात अडकले होते. जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने आर्मी, एसडीआरएफ टीम व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मदत व बचाव कार्य वेगाने करुन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांना मदत व त्यांच्या पुनर्वसनाची कार्यवाही तत्परतेने करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव