– मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पुण्यातून ठोस पाठिंबा मिळत असून कोंढवा परिसरातील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत मुंबई गाठली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी पुण्यातील मुस्लिम बांधव अन्नधान्य घेऊन रवाना झाले. “आंदोलन हा समाजाच्या हक्काचा लढा आहे. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे,” असे मत मुस्लिम बांधवांनी व