पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम मध्य रेल्वेमार्फत गोडसेवाडी येथे सुरू आहे. या कामामुळे कोरेगाव कठापूर रस्ता ते गोडसेवाडी गावादरम्यानचा मुख्य रस्ता खराब झाला आहे, तो रस्ता पावसाळ्यानंतर मध्य रेल्वेकडून करून दिला जाईल. तोपर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्याची डागडुजी करावी, अशी विनंती करणारे पत्र मध्य रेल्वे दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या संपर्क कार्यालयातून शनिवारी दुपारी दोन वाजता माहिती देण्यात आली.