कोरेगावचे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या घनश्याम बल्लाळ यांनी राजकीय दबावापोटी सर्वसामान्य जनतेवर आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी सोमवारी दुपारी दोन वाजता कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांची भेट घेतली व निवेदन सादर केले.