हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर केल्यानंतर आता बंजारा समाजाने देखील अशीच मागणी जोर धरली आहे. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे.हैदराबाद गॅजेटमुळे विखुरलेले बंजारा समाजाचे घटक आता एका प्रवर्गात येऊ शकतील, अशी आशा समाजाने व्यक्त केली आहे. “मराठा समाजाला गॅजेट लागू होऊ शकते, तर आमच्याकडेही सर्व पुरावे असताना बंजारांना गॅजेटचा लाभ मिळालाच पाहिजे”