वैयक्तिक अंतर्गत संबंधातून शिये फाटा टोप येथील फेडरल बँकेच्या एटीएम परिसरात आज शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गोळीबार झाला.या घटनेत दोन व्यक्तींनी पिस्तुल हिसकावण्याचा प्रयत्न केल्यामुळे पिस्तुलातून तीन गोळ्या हवेत झाडल्या.यामध्ये एक व्यक्ती जिवघेण्या हल्ल्यातून बचावला.घटनेनंतर जमलेल्या जमावाने पिस्तुल रोखणार्यास बेदम मारहाण केली,ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.घटनेचे मुख्य आरोपी गणेश शेलार (वय ४५), रा.नागाव, ता.हातकणंगले यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.