एका वयोवृद्ध महिलेची दोन जनाविरुद्ध पोलिस तक्रार दिली आहे. सदर महिला हिला डोळ्यांनी व्यवस्थित दिसत नाही. बंडू काशिनाथ नेवारे याने सदर महिलेला दोन लाख 80 हजार रुपये मिळतील त्यासाठी दहा हजार रुपये भरा असे म्हणून पैशाचे अमिष दाखवून तिची फसवणूक केली . राजेश पांडुरंग ठाकरे याने वडिलांच्या मताचे पैसे मिळवून देतोय असे अमिष दाखवून सदर महिलेला अमरावती नेऊन तिच्या दस्ताऐवजांवर तीन ठिकाणी सह्या घेतल्या व फसवणूक केल्याची तक्रार सदर महिलेने पोलिसात दिली आहे. तेव्हा दोघाजनाविरुद्ध नोंद केली आहे.